आमच्या बद्दल

इस्त्रायल, इथोपिया सारख्या देशांप्रमाणे भारतातही कृषी उत्पन्न वाढीसाठी नवनवे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली व त्यातून हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले. मात्र पूर्वी हे तंत्रज्ञान मर्यादित वर्गापुरता मर्यादित होते. आता माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शेतकर्‍यांच्या हातात स्मार्टफोन आल्यानंतर जगभरातील माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होवू लागली आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकर्‍यांना नवनवीन माहिती, बाजारपेठे संबंधित गणितं, शासकीय योजना, तंत्रज्ञान आणि बरचं काही एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शेतशिवार’ हे हक्काचं व्यासपीठ कार्यरत आहे.

कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि. या कंपनी अंतर्गत कार्यरत असलेले ‘शेतशिवार’ हे पोर्टल शेतकर्‍यांना हंगामानुसार आवश्यक असलेली कृषी पिकांची माहिती, खत-बियाण्यांची उपलब्धता, बाजारपेठेतील स्थिती, भरघोस उत्पन्न घेणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रेरणादायी कथा, सिंचन, पिकांवर पडणारे रोग, शासनाच्या शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या योजना यासह सर्वच माहिती मोफत उपलब्ध करुन देते. यासाठी ‘शेतशिवार’ राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, कृषी विद्यापीठे-महाविद्यालये, कृषी क्षेत्रातील कंपन्या, शास्त्रज्ञ, तज्ञ, प्रगतिशील शेतकरी यांच्याशी सातत्याने संवाद साधून ती माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहे.

प्रगतिशील शेतकर्‍यांच्या मुलाखती, तज्ञांचे चर्चासत्र शेतकर्‍यांपर्यंत पोहचवून कृषी उत्पादन वाढीसाठी शेतशिवार खारीचा वाटा उचलत आहे. कृषी क्षेत्रातील माहितीच्या समुद्रातील अमुल्य रत्ने शोधून ती शेतकर्‍यांपर्यंत पोहचविली तरच देशात पुन्हा एकदा हरितक्रांती घडेल, यावर आमचा ठाम विश्‍वास आहे. याच दृष्टीने शेतशिवार ही चळवळ प्रयत्नशिल आहे. या चळवळीत आपणही सामिल व्हा…..