गायींना गाणी ऐकवली तर खरचं दूध जास्त देतात का?

music-for-cow

मुंबई : शेती पुरक व्यवसायांमध्ये दूग्ध उत्पादनाला प्रचंड महत्व आहे. दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी पशूंना दर्जेदार आहार दिला जातो, असे सर्वांना माहितच आहे. मात्र दुभत्या जनावरांना गाणी ऐकवली तर दूध उत्पादनात वाढ होते, असे कुणी म्हटल्यास तुम्हाला काय वाटेल? मात्र एका तरुण शेतकर्‍याने हा प्रयोग यशस्वीरित्या राबविला असून त्याने याचा एक व्हिडीओ देखील तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आतापर्यंत दूध उत्पादन वाढवण्यासाठी हिरव्या चार्‍यावर भर देण्याचा सल्ला अनेकवेळा शेतकर्‍यांच्या कानी पडला असले पण तुर्की येथील इज्जत कोकॅक नावाच्या तरुणाने दुभत्या गायींना हेडफोन लावून गाणी ऐकण्यास लावले. गाणी ऐकणे हे भावनिकदृष्ट्या हे जनावरांसाठी चांगले असते. ज्यावेळी जनावरे मनाने प्रसंन्न असतात त्यावेळी ते अधिकचेही दूधही देतात, असे इज्जत कोकॅकचे म्हणणे आहे.

इज्जत याने १०० गायी पाळल्या आहेत. एक गायीचे दिवसाला साधारण: २२ लिटर दूधाचे उत्पादन होते. मात्र, दुभत्या जनावरांनी जेव्हापासून शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरवात केली तेव्हापासून उत्पादनात वाढ झाली आहे. ते थोडी नाही ५ लिटरने. आता गायी दिवसाला २७ लिटर दूध देत असल्याचा दावा त्याने केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर अपलोड केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version