• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणार ऑनलाइन व्यवसाय परवाने; वाचा काय आहे योजना

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in बातम्या
March 7, 2022 | 11:40 am
farmer-producer-company

पुणे : शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (Farmer producer ompany) व्यवसाय परवाने घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. 

राज्यात पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने सहकारा सोबतच उत्पादक कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटक शेतकरी उत्पादक कंपनी नि‍र्मिती करण्यात अग्रेसर आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या चळवळीस बळकटीकरणाचे साहाय्य होत आहे. नि‍र्मिती झालेल्या शेतकरी कंपन्या प्रामुख्याने व्यवसायाची कास धरण्यासाठी शासकीय योजनांचे साहाय्य घेत आहेत. परंतु संपूर्णपणे व्यवसायात उतरण्याच्या अनुषंगाने त्यांचे मार्फत पूर्ण तयारी झालेली नसल्याने निदर्शनास येत आहे.

राज्यातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी शेतकरी कंपन्यांनी व्यवसायात उतरण्याच्यादृष्टीने कृषी व पणन यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले होते. परंतु अद्यापही राज्यात स्थापित झालेल्या शेतकरी कंपन्या  व्यवसाय उभारण्याच्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. 

आवश्यक परवाने

शेतकरी कंपन्यांना विक्री व्यवस्थेत उतरण्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने थेट पणन, खासगी बाजार सिंगल लायसन  यापैकी एक परवाना घेण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ५ (डी) व नियम १९६७ मधील ‍नियम ४ (बी) नुसार थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करण्यासाठी थेट पणन परवाना व नियम ४ (सी) नुसार खासगी बाजाराचा परवाना पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून दिले जाते. सदर परवाना घेण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज पणन संचालनालय कार्यालयामध्ये सादर करावा लागतो.

लायसन घेण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परवाना घेण्याबाबतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. 

ऑनलाइन अर्ज व त्याअनुषंगाने लागणारी आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड/सादर करावीत. परवाना घेण्यासाठी www.dom.msamb.com या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

थेट विपणन परवान्यासाठी पात्रता

एका किंवा अनेक बाजार कार्यक्षेत्रामधून शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल खरेदी करू इच्छिणारी व्यक्ती, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन इ. थेट पणन परवाना मिळविण्यासाठी पात्र आहे.

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: Farmer Producer Companyशेतकरी उत्पादक कंपनी
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
summer-crop

उन्हाळी पिकांसाठी असे करा नियोजन

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट