यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र त्याचवेळी बाजारपेठेत सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत.

उलट परिस्थिी तुरी बाबत दिसून येत आहे. तुरीला कधी ६ हजार ३०० पेक्षा अधिकचा दर नव्हता पण आता तुरीच्या दरात वाढ होऊन तूर ६ हजार ७०० रुपये क्विंटलवर स्थिरावली आहे.

केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता.

सोयाबीनपेक्षा तुरीला अधिकचा दर मिळत आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभर्‍याची आवक होत आहे. शेतकर्‍यांना खरिपासाठी पैशाची गरज आहे.