वावर आहे तर पॉवर आहे; शेतात राबणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली. एक सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आपणा सर्वांना माहितच आहे की एकनाथ शिंदे हे आधी रिक्षा चालक होते. मात्र त्यांनी हिंम्मतीवर आणि स्व कतृत्त्वावर मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांशी जुळलेले व जमीनीवर पाय असलेले नेते म्हणून ओळखले जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का एकनाथ शिंदे हे एक शेतात राबणारे शेतकरी देखील आहेत.

eknath 3

एकनाथ शिंदे यांना शेतीची प्रचंड आवड आहे. त्यांना जेंव्हाही वेळ मिळतो तेंव्हा ते शेतात जावून कामे देखील करतात.

भात शेतीत काम करतांना एकनाथ शिंदे. एखाद्या कसलेल्या शेतकर्‍याप्रमाणे ते शेतात काम करतांना अनेक वेळा आढळून येतात.

भात शेती करतांनाचे त्यांचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो खरे असून निवडणूक किंवा कोणताही राजकीय स्टंट नाही.

एकनाथ शिंदे यांना बैलगाडी किंवा ट्रॅक्टर चालविणे खूप आवडते. यामुळे शेतात आल्यावर बैलगाडीने कामे करणे असो का ट्रॅक्टरव्दारे कामे करणे, ते सर्व कामे मोठ्या आवडीने करतात.

कसलाही बडेजावपणा न करता थेट शेतातील चिखलात उतरुन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभला आहे.

Exit mobile version