शेतकर्‍याने खडकाळ माळरानावर फुलवली फणसाची बाग; वाचा एका शेतकर्‍याच्या जिद्दीची कहाणी

fanas

नांदेड : जिल्ह्यातील सुजलेगांवच्या खडकाळ माळरानावर एका शेतकर्‍याने फणसाची बाग फुलवून त्यातून मोठे उत्पन्न घेवून दाखविले आहे. योग्य नियोजन व बाजारपेठेचे गणित समजून घेत मधुकर शंकर सज्जन या शेतकर्‍याने पारंपारिक शेती व्यवसायला फाटा देत आर्थिक उन्नतीच्या मार्गावरुन प्रवास सुरु केला आहे. सज्जन यांच्या जिद्दीची ही कहाणी राज्यातील अन्य शेतकर्‍यांना प्रेरणा देणार आहे.

मधुकर शंकर सज्जन यांनी तर ७ वर्षापूर्वीच माळरानावर फणसाची लागवड केली होती. गेल्या ६ ते ७ वर्षापासून ते ही बाग जोपासत आहेत. आता फणसाला फळधारणीही होऊ लागली आहे. विशेष म्हणजे फणस हे कुण्या बाजारपेठेत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही तर लगतच्या शहरतील नागरिके हे थेट शेताच्या बांधावर येऊन फणसाची खरेदी करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे मागणी अधिक असल्याने एक फणस जवळपास २०० रुपयांना विकले जात आहे.

फणसाच्या झाडाला साधारणत: लागवडीनंतर १० वर्षांनी फळधारणा होत असते पण यांनी योग्य नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन करुन फणसशेती यशस्वी करुन दाखविली आहे. प्रत्येक झाडाला २४ तासातून एकदा पाणी देणे, खतांची योग्य मात्र देणे, औषध फवारणीसह सर्वच बाबतीत योग्य काळजी घेतल्याने कमी कालावधीत भरघोस उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

Exit mobile version