कॉर्पोरेट नोकरी सोडून महिला करतेेय शेती; कमाई लाखों रुपये

manjiri nirgudkar rao

पुणे : प्रत्येकजण नोकरीच्या मागे धावत असतो. शेतकर्‍यांची मुलंही शेती परवडत नाही असे म्हणत नोकरीचा मार्ग निवडतात. मात्र मंजिरी निरगुडकर-राव या उच्च शिक्षित महिलेने कॉर्पोरेटे क्षेत्रातील नोकरीचा राजीनामा देवून शेती कसायला सुरुवात केली. आता त्या शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्या कोणत्या पिकांचे उत्पादन घेतात व कशा पध्दतीने शेती करतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

निरगुडकर-राव यांनी मार्केटिंगमधून त्यांनी एमबीए केले. त्यानंतर त्यांनी तब्बल १२ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र त्यांना नोकरीचा कंटाळा आला. आपण काहीतरी नवं केलं पाहिजे. याचा विचार करुन त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना बराच त्रास झाला मात्र त्यांनी शेतीला अधुनिकतेची जोड देत शेतात अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यातील काही प्रयोग यशस्वी झाले तर काही अयशस्वी!

आज शेतातून चाळीसहून जास्त उत्पादने त्या घेत आहेत. मध, तांदूळ, कलिंगड, नारळ, तीळ, भुईभुग आदी पिकांचे उत्पादन घेत आहे. यावर न थांबता त्यांनी शेतात तांदळाचे उत्पादन घेत नारळ, कलिंगड, तीळ, भुईमुगाच्या शेंगा यातून मसाले, चटण्या यासारखी उत्पादने तयार केली आहेत. यातून त्या अतिरिक्त नफा कमवित आहेत. त्यांच्या शेतातून तयार झालेली उत्पादने विदेशात निर्यात होत आहेत.

Exit mobile version