युट्युबचा असा देखील वापर; सुगंधी वनस्पती शेतीतून लाखोंची उलाढाल

geranium-marming-Vitthal-Chintalwar-success-story

विठ्ठल चिंतलवार : जिरेनियम सुगंधी वनस्पतीची शेती

शेत शिवार । पुणे : पारंपारिक शेतीसह वेगळी वाट निवडणार्‍या काही शेतकर्‍यांची यशोगाथा आपण नेहमीच वाचत असतो. असाचा काहीसा प्रयोग दोन शेतकर्‍यांनी वेगवेगळ्या ठिकाणी करत लाखों रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एका तरुण शेतकर्‍याने दुबई व सिंगापूरला उच्च शिक्षण केल्यानंतर परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जिरेनियम सुगंधी वनस्पतीची शेती (Geranium Farming) करत स्वत:ला सिध्द करुन दाखविले आहे.

जिरेनियमची शेती ही कमी खर्चिक असून, एकदा पीक लागवड केल्यावर सलग तीन वर्ष त्यापासून उत्पन्न मिळू शकते. जिरेनियम या सुगंधित वनस्पतीपासून तेलाची निर्मिती होते, जिरेनियमचे एक लिटर तेलाला बारा हजार ते तेरा हजार रुपयांचा बाजार भाव मिळतो. तसेच खाली राहणार्‍या सुका कचर्‍याचा उपयोग खत म्हणून देखील होऊ शकतो. जेरीनियम शेतीचे करण्यासाठी एक एकर शेतीसाठी साधारणपणे १० हजार रोपे लागतात. एकरी १० ते १५ किलो तेलाचे उत्पादन करता येते. साधारणत: शेतकर्‍यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो.

एका किलोला १२ ते १४ हजार रुपये भाव

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील विठ्ठल चिंतलवार (Vitthal Chintalwar) या शेतकर्‍याने जिरेनियम शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीचा एक व्हिडीओ युट्युबवर पाहिला. त्यानंतर अहमदनगरमध्ये जिरेनियम शेतीचा प्लँट पाहिला आणि जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमची लागवड करण्यासाठी विठ्ठल चिंतलवार यांना लागवड, ड्रीप आणि खते यासाठी एकरी १ लाख रुपये खर्च आला. विठ्ठल चिंतलवार यांना त्यांच्या शेतीतून जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून ३० ते ३५ किलो तेल मिळते.

जिरेनियमच्या तेलाला एका किलोला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळतो. विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीत पुढचं पाऊल टाकत स्वत:चा डिस्टिलेशन प्लँट उभा केला. त्यासाठी त्यांना सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च आला. मुंबई येथील कंपन्यांनी विठ्ठल चिंतलवार यांच्याशी करार केला आहे. थेट मुंबईच्या कंपन्यांशी लेखी करार केल्यामुळे उत्पन्नाचा हमखास मार्ग चिंतलवार यांना उपलब्ध झाला आहे. असाच दुसरा यशस्वी प्रयोग इंदापूर तालुक्यातील अंगद शहा या तरुण शेतकर्‍यांने करुन दाखविला आहे.

दुबई व सिंगापूरला उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या अंगद ला चांगल्या पगाराची नोकरी होती मात्र कोरोनाच्या काळात मायदेशी परतलेल्या अंगदने जेरीनियमची शेती करण्याचे ठरवले. इंदापूर भागामध्ये शक्यतो ऊस, केळी कांदा अशाप्रकारचे नगदी पिके घेतली जातात परंतु अंगदने आधुनिक शेती करण्याचा विचार करत तो यशस्वी देखील करुन दाखविला.

Exit mobile version