गारठा वाढतोय… या जिल्ह्यात निच्चांकी तापमानाची नोंद

thandi

पुणे : दिवाळी संपताच रात्रीचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.६, लोहगाव १४.७, जळगाव १४, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १३.८, नाशिक १३.३, सांगली १७.२, सातारा १४.३, सोलापूर १६.१, मुंबई २४, सांताक्रूझ २०.५, रत्नागिरी २२.२, पणजी २२.८, डहाणू २०.३, उस्मानाबाद १५.२, औरंगाबाद १३, परभणी १५.४, नांदेड १६.४, अकोला १७.८, गोंदिया १७, नागपूर १६.८

Exit mobile version