शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! राज्यातील ‘या’ भागासाठी IMD कडून अलर्ट जारी

weather-alert-rain

मुंबई : राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेलं पाहायला मिळालं आहे. अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. त्यामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झालेलं आहे. अशातच काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain Alert Update News

भारतीय हवामान विभागाकडून २६ ते २८ सप्टेंबरसाठी हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीनं याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. खरिप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असताना पाऊस सुरु असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. राज्यात येत्या २,३ दिवसातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयएमडीकडून २६ ते २८ सप्टेंबर दरम्यानचे हवामानाचे इशारे जारी केले आहेत.

२६ सप्टेंबरला या जिल्ह्यानं अलर्ट
२६ सप्टेंबरला लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२८ सप्टेंबरला या जिल्ह्याना इशारा
२८ सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version