खरिपाची पेरणी करण्याआधी जाणून घ्या काय आहे हवामानतज्ञांचा सल्ला?

Success farmer

पुणे : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा अधिक वरुणराजा बरसणार असला तरी सुरवातीचा काळ काही निराशाजनक राहणार आहे. जून महिन्यात पावसाचा खंड पडणार असल्याने शेतकर्‍यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याची गडबड करु नये असा सल्ला हवामानतज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

अर्थकारणाच्या दृष्टीने शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम हा महत्वाचा मानला जातो. या हंगामातील पिकांवरच शेतकर्‍यांचे सर्वकाही अवलंबून असते. उत्पादनवाढीसाठी पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे मानले जाते. याशिवाय पिकांची वाढ होत नाही. शिवाय पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट ओढावते.

यंदा तर जूनमध्ये पावसाचा खंड असणार आहे असा डॉ. साबळे यांनी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे. डॉ. साबळे यांनी महाराष्ट्रातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. तर एकूण पावसाची सरासरी ही १०१ टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे. यंदा पावासाचा अधूनमधून खंड राहिला तरी पाऊसकाळ चांगला राहणार असल्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे.

Exit mobile version