लेट पण थेट.. अखेर मान्सून महाराष्ट्रात धडकला, IMD ची माहिती

monsoon

पुणे : महाराष्ट्रातील मान्सूनसंदर्भात (Monsoon) एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील शेतकरीसह सर्वच जण मान्सूनच्या प्रतिक्षेची आतुरतेने वाट पाहात आहे. अखेर आज 10 जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला असून याबाबतची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे.

यंदा मान्सून केरळात ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधी २९ मेला दाखल झाला होता. त्यानंतर मात्र बदलत्या वातावरणाने पुढील प्रवास खोळंबला होता. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती नसल्याने महाराष्ट्रातील आगमन लांबल्याने शेतकरीसह सर्वच जण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.

दरम्यान, अद्यापही खरिपातील पेरण्यांना उशिर झालेला नाही. पण पाऊसच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होणार यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली होती. पण हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पावसाने हजेरीच लावलेली नाही. अजूनही परेणृीला उशिर झाला नाही, आता कोकणात आगमन झाल्याने वेळेत मान्सून राज्यात सक्रीय झाला तर सर्वकाही वेळेत होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.

गोव्यातही मान्सून दाखल
आता कुठे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग वाढला असून गोव्यात राजधानीसह डिचोली, सत्तरी, वाळपाई, सांगे, काणकोण तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता नैऋत्य भागातून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने मान्सूनने पश्‍चिम आणि मध्य भारताकडे वाटचाल सुरु केल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

Exit mobile version