राज्यात पुढचे ४८ तास महत्वाचे या ९ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

rain

मुंबई : राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे आहे. मागच्या २४ तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Rain Alert In Maharashtra

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. संततधार पावसामुळे शेतकर्‍यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही धुमाकूळ घातला. खानदेशात दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही भागांत नाल्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या. नाशिक जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसणार आहे.

पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

Exit mobile version