शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान ; या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

rain 1

जळगाव /मुंबई : जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर राज्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल तर काही ठिकाणी शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. मात्र अशातच आता राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असलयाचे दिसून येतेय. मागील दोन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आजही हवामान विभागाने राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्यात परतीचा पाऊस ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान माघारी फिरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारासजळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच आज शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

एकीकडे ज्वारी, सोयाबीनसह काही पिके कापणीवर आली आहे. तर कपाशी देखील अनेक वेचणीवर आलीय. मात्र अशातच परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version