शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज?

weather-alert-rain

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी धो-धो पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याकडून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा पुन्हा इशारा दिला आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. काल राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी या पावसामुळ वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.

राज्यात अनेक दिवसाच्या खंडानंतर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे. अशातच राज्यात अनेक काही दिवस पावसाचे राहणार आहे.

दरम्यान, हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मध्यमहाराष्ट्र, विदर्भमध्ये उद्या १८ सप्टेंबरपासून पुढील ४ दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यावेळी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून परतीच्या पावसाचे वेध येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाची तीव्रता टिकून राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version