हवामानाच्या ‘या’ अंदाजाने वाढविली शेतकर्‍यांची चिंता

weather-alert-rain

मुंबई : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता खरिप पिकांच्या कापणीचा व रब्बी पिकाच्या लागवडीची वेळ असतांना परतीचा पाऊस धुमाकुळ घालत आहे. त्यातच भरीस भर म्हणून हवामान खात्याने एक अंदाज असा वर्तविला आहे की, ज्यामुळे शेतकर्‍यांची चिंता अजूनच वाढली आहे. जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकर्‍यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

देशाच्या विविध भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार आहेत. त्यामुळे यंदा राज्यसह देशभरात डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता आहे. दक्षिण आशियाई हवामान परिषदेत हवामान तज्ज्ञांकडून डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस झाला तर त्याचा मोठा फटका हा शेतकर्‍यांना बसणार आहे. प्रमुख्याने कापूस, सोयाबीन, बाजरी ही पिके सकंटात सापडणार आहेत. तसेच गहू आणि ढगाळ वातावणामुळे हरभारा या पिकांना देखील कमी अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच काही भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले, पिके खराब झाल्यानं शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. या संकाटातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांपासून राज्यत पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा फटका हा सोयाबीन आणि कापूस या पिकाला सर्वाधिक बसला आहे. आता यंदा डिसेंबरपर्यंत राज्यासह देशात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. जर डिसेंबरपर्यंत पाऊस झाल्यास कापूस या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Exit mobile version