एमबीए नवरा-सीए बायकोने लाखोंचे कॉर्पोरेट पॅकेज सोडून दाम्पत्याने धरली शेतीची वाट; एक कोटींच्या वर उलाढाल

swastik-nursery-jodhpur

पुणे : शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकर्‍यांची मुलं नोकरीची वाट धरतात. मात्र काहीजण कॉर्पोरेट क्षेत्रातील गलेलठ्ठ पगारांचे पॅकेजेस सोडून शेतीत करिअर करण्याचा मार्ग निवडतात. असंच काहीसं घडलं आहे. पुण्यातून मार्केटिंगमध्ये एमबीए केलेल्या ललित व सीए असलेली त्यांची पत्नी खुशबु यांच्या सोबत! (Lalit And Khushbu Success Story)

पुण्यातून मार्केटिंगमध्ये एमबीए केल्यानंतर ललितला २०१३ मध्ये ८ लाखांचे पॅकेज मिळाले. बँकेत रिलेशनशिप मॅनेजरची नोकरी होती. पत्नीही चार्टर्ड अकाउंटंट आहे. मात्र या दोघांनी नोकरीच्या मागे न लागता. रोपवाटिका सुरु केली आहे. कुणाला विश्‍वास बसणार नाही मात्र त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल १ कोटी रुपयांच्या वर पोहचली आहे.

ललितने सांगितले की, एके दिवशी तो पुण्याच्या वाघोली भागात गेला तेव्हा त्याला तिथे मोठमोठी ग्रीन हाऊस आणि पॉलीहाऊस दिसले. त्यांच्याविषयी माहिती गोळा केली, तेव्हाच वडिलोपार्जित जमिनीवर हरितगृह आणि पॉली हाऊससह रोपवाटिका उभारण्याचा निश्‍चय केला. यानंतर २०१८ मध्ये स्वस्तिक नावाने रोपवाटिका सुरू करण्यात आली. ललितने सांगितले की, ही रोपवाटिका १५ लाखांच्या बजेटमध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला २३ ते ३० लाख रुपयांची उलाढाल होती. पण, आता ती वाढून १ कोटी झाली आहे.

ललित जोधपूरच्या आयआयटीच्या गार्डनचा प्रकल्पही हाताळत आहे. याशिवाय अनेक खाजगी बागा आहेत, ज्यांच्या बागकामाची जबाबदारी ललितच्या स्वस्तिक नर्सरीची (Swastik Nursery Jodhpur) आहे. त्यामुळेच त्यांच्या नर्सरीतील इनडोअर-आउटडोअर रोपांना मोठी मागणी आहे. टाटा कंपनीच्या एका प्रकल्पातून त्यांना हा प्रकल्प मिळाला. आयआयटी कॅम्पसमध्ये पुरेसे पाणी किंवा चांगली माती नव्हती. ठिबक सिंचनाच्या मदतीने वनस्पती आणि गवत विकसित केले जाते. सुमारे एक कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता.

Exit mobile version