आंब्यांसह रब्बी पिकांसाठी पुढील ४ दिवस घातक; हवामान खात्याचा इशारा

rain-weather-updates

शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने यापूर्वीच महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जरी केला आहे. अंदमान आणि अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबामुळे पावसासाठी पोषक वातारण तयार झाले आहे. यामुळेच पुढील चार दिवस राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.

सध्या आंब्याला पालवी आली असून जर पाऊस आलाच तर मोहोर येण्याची प्रक्रिया लांबवणीवर पडेल. यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी पांढरा कांदा, वाल, मूग आदी पिकांची लागवड करत आहेत. यासर्वांमुळे जर पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस झाला तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे.

आज मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज संबंधित जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन-चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version