येत्या २ दिवसात राज्यातील गारठा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

winter-weather-updates

शेत शिवार । Today Weather Updates गेल्या काही दिवसात गायब झालेली थंडी पुन्हा आता जोर धरत आहे. विदर्भ, मराठवाड्यसह राज्यातील अनेक भागात किमान तापमानात मोठी घाट झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसात या तापमानात अजून ओठी घाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २-३ दिवस तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. आज नागपूर येथे १२. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नांदेड , परभणीत देखील १४ अंश किमान तपमान आहे . तसेच आज राज्याच्या इतर भागात सरासरी तापमान १४-१६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1471320887898955779
Exit mobile version