मार्चच्या मध्यातच, पारा चाळीशीकडे

weather

नागपूर : Weather Updates | यंदा महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या मध्यातच तापमानाने ४० डिग्री सेल्सियसचा टप्पा गाठला आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी राज्यातील १२ शहरांतील तापमानाने चाळिशी पार केली. अकोला व भुसावळात सर्वाधिक ४२.९ तापमानाची नोंद झाली.

सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वार्‍यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या आसपास असेल. तसाही मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पारा ४० अंशांवर पोहोचून जातो. मात्र या सीजनमध्ये मार्चच्या मध्यातच या आकड्यावर पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांत कमाल तापमान ३.२ अंशांनी वाढले आहे. येत्या दोन दिवसांत यामध्ये एक किंवा २ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान

भुसावळ, अकोला : ४२.९, वाशिम : ४१.५, वर्धा : ४१.४, अमरावती : ४१.०, सोलापूर : ४१.०, अहमदनगर : ४०.८, नागपूर : ४०.९, परभणी : ४०.७, चंद्रपूर : ४०.६, यवतमाळ : ४०.५, जळगाव ४०.० नांदेड : ४०.०, औरंगाबाद : ३८.९, मालेगाव : ४०.०, गोंदिया : ३९.२, ठाणे : ३९.०, नाशिक : ३९.०, कोल्हापूर : ३९.०, बुलडाणा : ३८.५, पुणे : ३८.१.

Exit mobile version