Weather Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

weather-updates-rain

फोटो क्रेडिट : Times of India

Weather Updates | Shet Shivar | शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सर्वजण पावसाची वाट पाहत असतांना हवामान खात्याने एक दिलासादायक माहिती दिली आहे. पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.

दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावेल. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Exit mobile version