‘या’ ठिकाणी मुसळधार तर ‘या’ ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज

rain-updates-news

Credit : Buzzonearth

Weather Updates | गेल्या दोन-तीन आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या पावसाचे राज्यात आगमन झाले आहे. गत ४८ तासांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनची आगेकूच होत असली तरी त्याचा वेग मंदावला आहे. मात्र पुढील पाच दिवसात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या भागात मुसळधार; धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर सातारा सांगली भागात तुरळक पाऊस होणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तविली आहे.

मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांचं बरंच नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पाट फुटलाय. अचानक पाट फुटल्याने एक तरुण पाण्यात अडकला होता. तालुक्यात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्येही वरुणराजाने हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

मुसळधार पाऊस : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
तुरळक पाऊस : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली
मेघगर्जना : सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद

Exit mobile version