जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात उन्हाळी सोयाबीन उगवलं व बहरलंही मात्र आता अंतिम टप्प्यात फुलं आणि शेंगाच लागत नसल्याने शेतकरी धास्तवलेला आहे. तीन महिन्याची मेहनत आणि उत्पादनावर झालेला खर्च वाया जातो की काय? अशी भीती शेतकर्यांना सतावू लागली आहे.
उन्हाळी हंगामात यंदा प्रथमच विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पोषक वातावरण व पाण्याचा साठा तसेच यंदा कृषी विभागानेही सोयाबीनचा पेरा करण्याचे आवाहन शेतकर्यांना केले होते. त्यास प्रतिसाद देत शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणाता सोयाबीनचा पेरा केला. पण आता अंतिम टप्प्यात भोकरदन तालुक्यासह परिसरातील सोयाबीनला ना फुले लागलेली आहेत ना शेंगा. त्यामुळे या बहरलेल्या पिकातून उत्पादन मिळणार की नाही अशी अवस्था सध्या झाली आहे.
कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीनचे महत्व शेतकर्यांना पटवून दिले होते. मात्र, त्यानंतर जे मार्गदर्शन गरजेचे होते ते झालेच नाही. उन्हाळी हंगामातील सोयाबीन हा प्रयोग शेतकर्यांसाठी नवीन होता. त्यामुळे मंडळानिहाय का होईना शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन झाले असते तर ही समस्या उद्भवली नसती, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही बियाणांसाठी शेतकरी भटकंती होणार का हा प्रश्न आहे. दरर्षी शेतकर्यांना अधिकच्या किंमतीने बियाणे खरेदी करावे लागते शिवाय यामधून फसवणूकही होते. यंदाही त्याचीच पुनारावृत्ती होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हे पण वाचा :