दररोज ५० ते ८० लिटर दूध देवू शकते ‘ही’ गाय

cow milk

पुणे : दररोज सरासरी ५ ते १२ लिटर दुध देणार्‍या गायींच्या जातींबद्दल आपणा सर्वांना माहित आहेच. मात्र एक गाय दररोज ५० ते ८० लिटर दूध देवू शकते, असे कुणी सांगितल्यास चटकन विश्‍वास बसणार नाही. मात्र भारतात गायीची एक जात अशी आहे की दररोज ५० ते ८० लिटर दूध देवू शकते. ही गाय गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. या गायीचे दूध काढण्यासाठी एक नव्हे तर चार लोकांची गरज असते. ही गाय म्हणजे गीर गाय

गीर गाय दररोज ५० लिटर ते ८० लिटर दूध देऊ शकते. देशातील सर्वाधिक दूध देणार्‍या गायींमध्ये तिचे नाव समाविष्ट आहे. ब्राझील आणि इस्रायलमधील लोकांना या जातीचे संगोपन करणे सर्वात जास्त आवडते. गीर गायीच्या शरीराची रचना गीर गाईच्या शरीराच्या रचनेबद्दल बोलायचे झाले तर या जातीचा रंग लाल आणि कासे मोठ्या असतात. याशिवाय कान खूप लांब असतात आणि खाली लटकतात.

गीर गायीचा आहार हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांना प्रथिनांची गरज आहे, फक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार द्यावा लागतो. जव, ज्वारी, मका, गहू, कोंडा आदी पदार्थांचा आहारात समावेश करता येतो. हे चारा म्हणून बरसीम, चवळी, मका, बाजरी आदींचा समावेश केल्यास गायी त्या मोठ्या आवडीने खातात.

Exit mobile version