१० शेळ्या पाळण्यासाठी मिळणार ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या कसे?

Goat-rearing

बीड : शेळीपालन हे आजच्या काळात कमाईचे उत्तम साधन आहे. त्याच्या व्यवसायामुळे अनेक लोक आज चांगली कमाई करत आहेत. जर तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर शेळीपालन व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही सरकारी कर्जाच्या मदतीने शेळीपालन करू शकता, या संदर्भात आज आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० शेळ्यांवर बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन शेळीपालन योजना २०२२ अंतर्गत १० शेळ्यांवर ४,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. ही कर्जाची रक्कम कोणतीही सरकारी बँक, खाजगी बँक, स्मॉल फायनान्स बँक किंवा फायनान्स कंपनी मधून देखील मिळवू शकता.

शेळीपालन कर्जासाठी अर्ज कसा करावा
शेळीपालनावर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करावा लागेल. जिथे तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि गोट फार्मशी संबंधित माहिती द्यावी लागेल. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, अर्जदाराचे आधार कार्ड, रेशनकार्ड, वीज बिलाची छायाप्रत, शेळी फार्मचा प्रकल्प अहवाल, किमान ६ ते ९ महिन्यांसाठी बँक स्टेटमेंट, पासपोर्ट आकाराचा फोटो इ. देणे बंधनकारक आहे. तुमच्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तसेच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते.

Exit mobile version