तरुण शेतकऱ्याने केला शतावरी, अश्वगंधा लागवडीचा प्रयोग; कमविले लाखों रुपये

asparagus-and-ashwagandha-farming-success-story

शहादा : शतावरी आणि अश्‍वगंधा या औषधी पिकांबद्दल अनेकांना माहिती असते मात्र शेतात त्याची लागवड करुन त्यातून पैसा कमविण्याचा विचार फारसा कुणी करत नाही. मात्र शहादा तालुक्यातील पुसनद येथील एकनाथ चौधरी या तरुण शेतकर्‍याने शतावरी आणि अश्‍वगंधाची लागवड (Asparagus and Ashwagandha Farming) करत त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे.

अश्‍वगंधाचा पाला आणि रोपांना मोठी मागणी असते. शिवाय याला बाजारपेठ उपलब्ध असून मागणी पेक्षा उपलब्धता कमी आसल्याने दर पडण्याची भीती नसते. त्याचबरोबरच या औषधी वनस्पतीवर कीड पडण्याची शक्यता खूप कमी असल्याने फवारणी गरज नसते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता खूप कमी असते.

एकनाथ चौधरी यांनी आपल्या दहा एकर शेतात अश्‍वगंधाची लागवड केली आहे. शतावरी आणि अश्‍वगंधाची पाने मुळे कंद आणि बियांची विक्री करून चांगला नफा मिळवला आहे. अश्‍वगंधाच्या मुळाची वर्गवारी करून त्याची विक्री होत असते. त्याला १० हजार क्विंटल पासून ते ४० हजारपर्यंत गुणवत्तेनुसार भाव मिळतो.

चौधरी यांनी केलेल्या या नव्या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांनीही मसाले आणि आयुर्वेदिक पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहादासारख्या प्रतिकुल भागात शतावरी व अश्‍वगंधाची लागवड करण्याचा हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version