कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत; अंड्याच्या दरात मोठी पुन्हा घसरण

egg

मुंबई : राज्यातील कुक्कुटपालन व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत चालला आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे पशूखाद्य महागले असतांना आता महिन्याभरात सलग दुसर्‍या वेळी अंड्याच्या दरात घसरण झाली आहे. ठोक बाजारात तर प्रति शेकडा ५० रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा कमी झाल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही दरात घसरण झाली आहे. दिल्लीतील एनसीआर घाऊक बाजारात किंमतीतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही अंड्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत अंड्यांच्या किंमतीत शेकडामागे सरासरी ३०-५० रुपयांची घट झाली आहे. नॅशनल एग कॉर्प्स ऑर्डनेश कमिटीच्या अहवालानुसार बिहारमध्ये मध्यंतरी अंड्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. चालू महिन्यात तीन वेळा अंड्याचे दर बदलले आहेत. सुरवातीला ३८० रुपये शेकडा असे दर होते तर मध्यंतरी ५०० रुपये शेकडा अशी वाढ झाली होती तर आता दोन दिवसांमध्ये शेकड्यामागे २० ते ४० रुपायांची घसरण झाली आहे.

अंड्याच्या दरात घट झाल्याने वर्षभर झालेला खर्च काढणेही मुश्किल झाले आहे. सध्या एका अंड्याची किंमत ही ४.२५ ते ४.५० एवढी आहे. यापेक्षा कमी दरात विक्री करण्याची नामुष्की ओढावली तर झालेला खर्चही निघणे मुश्किल होणार आहे.

Exit mobile version