बारामती : राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक सुरु झाली आहे. गत आठवडाभरात ज्वारी, बाजरी, मका, सोयबीन, सुर्यफुल व गव्हाची आवक होत असली तरी भाव स्थिर आहे. दरम्यान बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात दि, ३ रोजी ज्वारीची ५०० आवक झाली असून प्रतिक्विंटल ४८०१ उच्चांकी दर मिळाला.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मकेची उच्चांकी आवक होऊन चांगल्या मकेला प्रति क्विंटल रू. २२०० दर निघाला. तसेच बाजरी, सोयाबीन, सुर्यफुल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल रू. ३५६१आणि सोयाबीनची ११६० क्विंटल आवक झाली सोयाबीनला प्रति क्विंटल रू. ५३१७ तर सुर्यफुलाची ७६० क्विंटल आवक होऊन सुर्यफुलास प्रति क्विंटल रू. ७०००दर मिळाला.
चालु वर्षी बारामती व आसपासच्या तालुक्यात पाऊसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सर्वच शेतमालाच्या आवकेत वाढ झाली आहे. यापुढे शेतकर्यांनी पिकांचे व्यवस्थित नियोजन करून सुधारित वाणांचा वापर करावा व जादा उत्पादन काढावे. शेतीत उत्पादित झालेला शेतमाल स्वच्छ व ग्रेडींग करून विक्रीस आणल्यास चांगला दर मिळेल व शेतकर्यांचा आर्थिक फायदा होईल असे सचिव अरविंद जगताप यांनी स्पष्ट केले.