‘ई-गोपाल’ : जनावरांचे आधार कार्ड, जाणून घ्या कसे?

पुणे : पशूपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना योजनांचा लाभ मिळा याकरिता ‘ई-गोपाल’ अ‍ॅप कार्यन्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून जनावरांचे टॅगिंग करता येणार आहे. हेच टॅगिंग आता जनावरांचे आधार कार्ड राहणार आहे. यामुळे एका क्‍लिकवर टॅगिंग केलेल्या जनावराची सर्व माहिती मिळणार आहे.

केवळ पारंपारिक शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांना जोडधंद्याचा सल्ला दिला जातो. जवळपास ९० टक्के शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालनाला पसंती देतात. आता पशुपालक शेतकर्‍यांना शासानाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी सरकारने ‘ई-गोपाल’ मोबाईल अ‍ॅप कार्यन्वित केले आहे. हे अ‍ॅप म्हणजे एकाप्रकारे जनावरांचे आधारकार्डच असेल. ज्या प्रमाणे आधार कार्डच्या माध्यमातून व्यक्तीची सर्व माहिती मिळते अगदी त्याप्रमाणेच ‘ई-गोपाल’ अ‍ॅप वर जनावरांचे टॅगिंग केले की माहिती मिळणार आहे. यात प्रत्येक गाई-म्हशींसाठी एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे.

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

या आधार कार्डमुळे लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय साह्य इतर कामेही सहज करता येणार आहेत. या टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानामध्ये काही ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जात आहे. या टॅगवर छापील १२ अंकी आधार क्रमांक आहे. आधार कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जनावरांचे टॅगिंग करण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून पशुसंवर्धन विभागातर्फे राबवला जात आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे या टॅगिंगचे काम सोपवण्यात आले आहे. यामध्ये पशूपालकाचे नाव, जनावराचे वय, किती येत झाले, कोणते आजार याची सर्व माहिती राहणार आहे.

Exit mobile version