अनुदानावर गाई-म्हशी घ्यायच्या असतील तर हे वाचाच…

cows-and-buffaloes

गाई-म्हशी

पुणे : शेती परवडत नाही म्हणून जोडधंदा करा, असा सल्ला अनेकांकडून दिला जातो. यात दूग्ध व्यवसायाचा सर्वात लोकप्रिय व्यवसाय म्हणून समावेश होतो. शेतकर्‍यांनी शेतीसोबत दूग्ध व्यवसाय करावा, यासाठी शासनातर्फे अनेक प्रोत्साहन योजना राबविण्यात येतात. मात्र यातील त्रृटींमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. आता नव्याने अनुदानावर दूधाळ गाई-म्हशीचे वाटप योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.

अशी असणार आहे अनुदानाची रक्कम

दोन दूधाळ जनावरे घेण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ७५ टक्के तर स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के, शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के, स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के असे अनुदान राहणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविल्या जाणार्‍या या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.

अनुदान लाभासाठी अटी-नियम

दूध उत्पादन वाढीच्या अनुशंगाने विचार करुन पशूसंवर्धन विभागाने संकरीत गाय, जर्सी, मुर्‍हा तसेच जाफराबादी यांचा समावेश राहणार आहे. तर देशी गाय, गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातीच्या गाई करिता अनुदान दिले जाते. ४ डिसेंबरपासून या योजनेला सुरवात झाली असून १८ डिसेंबरपर्यंत अर्ज हे भरले जाणार आहेत.

हे आहेत लाभार्थी निवडीचे निकष

यामध्ये वैयक्तिक पातळीवरही योजनेचा लाभ घेता येतो. शिवाय महिलांचा बचतगट असेल त्यांनाही अनुदानावर जनावरांची खरेदी करता येते तसेच अल्प भूधारक म्हणजे ज्या शेतकर्‍यांना १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे क्षेत्र असणार्‍यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर या अनुदानाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम तर मिळणारच आहे. पण विकासाच्या दृष्टीने हे वेगळे पाऊस राहणार आहे. याकरिता रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी असणे गरजेचे आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

लाभर्थ्यास स्वताचा फोटो, आधारकार्ड, रेशन कार्ड नंबर, सातबारा, ८ अ, अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाण पत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रेही अदा करावी लागणार आहेत.

ही आहे अधिकृत वेबसाईट

https://ah.mahabms.com/ या पशूसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन केल्यास योजनेची माहिती आणि लाभर्थ्याने भरावयाची माहिती ही समोर असणार आहे. विचारण्यात आलेली माहिती भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज पशूसंवर्धन विभागाकडे द्यावा लागणार आहे.

Exit mobile version