मुंबई : राज्यातील कोरडवाहू शेतीची जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत (पोकरा अंतर्गत) सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदानाची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत समुदायिक शेत तळ्यावर १०० टक्के अनुदान लाभर्त्यांना मिळणार आहे. या अनुदानाचा लाभ कोण घेवू शकतो? किती आकारमानाच्या शेततळ्याला किती अनुदान मिळेल?, अर्ज कुठे करायचा?, आवश्यक कागदपत्रे कोणती? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सामुदायिक शेततळे लाभ घेण्यासाठीच्या पात्रता व अटी :
ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहे.
सामुदायिक शेततळे हे दोन किंवा अधिक शेतकरी लाभार्थ्याने करणे आवश्यक असणार आहे.
लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल, तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळ्याचा लाभ त्या संबंधित शेतकरी समूहाला घेता येईल.
सामुदायिक शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल शेतकरी लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करणे आवश्यक असणार आहे.
लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असणे आवश्यक आहेत.
अर्ज कुठे करावा व कोणती कोणती?
इच्छुक शेतकर्यांनी http://https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. सामुदायिक शेततळे नोंदणीसाठी अर्जासह ७/१२ उतारा व ८-अ प्रमाणपत्र आवश्यक असते.