कलिंगडातून ८० दिवसांमध्ये मिळविले ४ लाखाचे उत्पन्न

Watermelon

उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील विजयकुमार आणि राजकुमार या राखुंडे बंधुंनी डिसेंबरच्या शेवटी एका एकरात लागवड केलेल्या कलिंगडातून केवळ ८० दिवसांमध्ये त्यांना ४ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.

कलिंगड हे हंगामी पीक असले तरी कोणत्या वेळेत दर मिळतील याचे गणित महत्वाचे आहे. काही शेतकरी हे उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता येईल याचा विचार करतात. राखुंडे यांनी एका एकरात शुगर क्विन वाणाची लागवड केली होती. दोन्ही रोपांमध्ये ६ फुटाचे अंतर सोडून सरी पध्दतीने लागवड केली तर सबंध शेत जमिनीवर मल्चिंगचे अच्छादन होते. ठिबकच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था करण्यात आली होती.

योग्य नियोजनामुळे योग्य वेळेत भरघोस उत्पादन मिळविण्यात राखुंडे बंधु यशस्वी झाले. त्यांच्या ४२ टनापैकी ३४ टन कलिंगडाची विक्री ही बांधावर झाली आहे. कलिंगडचा चांगला दर्जा असल्यामुळे व्यापार्‍यांनी १४ रुपये किलोप्रमाणे खरेदी केली आहे. यामधून राखुंडे बंधु यांना ५ लाख ४० हजाराचे उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय १ लाख खर्च वजा होता ४ लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version