२५० अंडी देणारी कोंबडी; जाणून घ्या सविस्तर माहिती

egg kombadi

नाशिक : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकर्‍यांची पसंती कुक्कुटपालन किंवा पशुपालनाला असते. ग्रामीण भागात कुक्कुटपालन करून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. अनेकजण विचार न करता व्यवसाय सुरू करतात. यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत कुक्कुटपालनाशी संबंधित योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. आज आपण कुक्कुटपालन करण्यासाठी सर्वाधिक फायदेशिर ठरणार्‍या कोंबडीच्या एका जातीबद्दल जाणून घेणार आहोत जी वर्षभरात तब्बल २५० अंडी देते.

कोंबडीच्या जातीमध्ये, प्लायमाउथ रॉक कोंबडी व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण या कोंबडीच्या जातीपासून आपल्याला वर्षभरात सुमारे २५० अंडी मिळतात. या कोंबडीच्या अंड्याचे सरासरी वजन सुमारे ६० ग्रॅम असते. तर कोंबडीचे एकूण वजन ३ किलो पर्यंत असते. या कोंबडीला अमेरिकन ब्रीड असेही म्हणतात.

भारतात या कोंबडीला प्लायमाउथ रॉक चिकन या नावानेही ओळखले जाते, कारण या कोंबडीच्या अंडीच नव्हे तर मांसालाही बाजारात मोठी मागणी आहे. त्याचे मांस लोकांसाठी आरोग्यदायी आहे. या कारणास्तव, प्लायमाउथ चिकन मांसाची किंमत देखील जास्त आहे. या जातीची कोंबडी अतिशय शांत स्वभावाची आहे. या कोंबड्यांना फिरायला आवडते, त्यामुळे त्यांचा शरीराचा आकारही चांगला असतो.

Exit mobile version