नॅनो युरियामुळे शेतकर्‍यांना होतोय मोठा फायदा; वाचा काय म्हणतोय केंद्र सरकारचा अहवाल

nano uria

नाशिक : रासायानिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर देखील जाणवू लागला आहे. शेतीत रसायनांचा अतिवापर माती, हवा आणि पाण्याचे नुकसान करत आहेत. या पर्याय म्हणून नॅनो युरियासारख्या नॅनो खतांचा वापर वाढविण्यास सरकार आग्रही आहे. मात्र नॅनो खतांबद्दल शेतकर्‍यांमध्ये अजूनही संभ्रम दिसून येत आहे. तज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांनुसार, नॅनो युरियामुळे युरियाचा वापर कमी होऊन उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले.

नॅनो युरियाच्या मूल्यमापनासाठी आयसीएआर आणि राज्य कृषी विद्यापीठांच्या संशोधन संस्थांद्वारे नॅनो युरियाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांद्वारे पीक उत्पादकता, खतांच्या डोसमध्ये कपात, शेतकर्‍यांचा नफा अशा विविध पैलूंवर लक्ष देण्यात आले आहे. सरकारचा दावा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आणि कृषी-हवामान झोनमध्ये नॅनो युरिया-लिक्विडच्या वापराच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की तांदूळ, गहू, मका, टोमॅटो, काकडी आणि सिमला मिरची यांसारख्या पिकांच्या गंभीर वाढीच्या टप्प्यावर नॅनो युरिया फायदेशीर ठरला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढते.

नॅनो युरियाबाबत पसरवण्यात येत असलेल्या संभ्रमावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण चाचणीनंतरच देशात नॅनो युरियाचा वापर सुरू करण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे खतांचा वापर कमी होऊन उत्पादनात वाढ होते. केंद्रीय खते समितीने (सीएफसी) डेटाच्या आधारे आणि जैवतंत्रज्ञान विभागाशी (डीबीटी) सल्लामसलत केल्यानंतर याची शिफारस केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देखील या संदर्भात डेटा आणि योग्य विचाराच्या आधारे शिफारस केली आहे.

Exit mobile version