कुक्कुटपालन: या जातीच्या देशी कोंबड्या मिळवून देतील मोठा आर्थिक फायदा

Poultry-farming

नागपूर : ग्रामीण भागात कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे. कुक्कुटपालनात फार मोठी गुंतवणूक न करताही व्यवसाय सुरु करता येतो. शिवाय या व्यवसायात गुंतवणुकीपेक्षा दुप्पटीने नफा मिळण्याची दाट शक्यता असल्याने अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाला पहिली पसंती देतात. या व्यवसायासाठी सरकार अनुदान देखील देते. याच अनुषंगाने आज आपण काही देशी जातीच्या कोंबड्यांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे कमी कालावधीत मोठा नफा कमवता येवू शकतो.

ग्रामप्रिया – कोंबडीची ही जात अंडी आणि मांस दोन्ही देते. त्यांचे मांस तंदूरी चिकन बनवण्यासाठी जास्त वापरले जाते. ग्रामप्रिया कोंबडीची वर्षभरात सरासरी २१० ते २२५ अंडी घालण्याची क्षमता आहे.

श्रीनिधी- श्रीनिधी कोंबडी देखील मांस आणि अंडी या दोन्हीद्वारे अधिक नफा मिळवू शकतात. या जातीची कोंबडी फार लवकर विकसित होते आणि फार कमी वेळात चांगला नफा मिळवून देते.

वनराजा- देशी कोंबड्यांमध्ये वनराजा सर्वोत्तम मानला जातो. या कोंबड्या १२० ते १४० अंडी घालतात. ही कोंबडी पाळल्यास कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो. घरगुती कुक्कुटपालनाचे फायदे देशी कोंबड्यांचे आणि कोंबड्यांचे मांस अतिशय चवदार आणि पौष्टिक असल्याने त्यास बाजारात मोठी मागणी असते.

Exit mobile version