या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

Maize

नंदूरबार : नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकर्‍यांना फायदा होत आहे. त्यातल्या त्यात मका उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा होत आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. पतवारीनुसार मक्याला २ हजार ४६२ ते २ हजार ८९९ पर्यंत दर मिळत आहे.

परतीच्या पावसामुळं शेतकर्‍यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अशातच काही शेतकर्‍यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत. त्यांच्या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं थोडाफार तरी दिलासा शेतकर्‍यांना मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे.

Exit mobile version