कांदा उत्पादकांना दिलासा! जाणून घ्या कसा?

onion

पुणे : गेल्या तीन महिन्यापासून कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पार रडकुंडीला आले आहेत. मात्र लवकरच कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कारण चांगल्या प्रतीच्या कांद्याला १६ ते १७ रुपये किलो असा दर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील जन्नुर तालुक्यातील आळेफाटा कृषी उत्पन्न बाजारापेठेत कांदा दरात वाढ झाली आहे. हेच दर राज्यभरात मिळतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे.

खरिपातील लाल कांद्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याचा उठावच झाला नाही. अनेक ठिकाणी तर शेतकर्‍यांनी कांदा फुकटात वाटला तर काही ठिकाणी फेकून दिला. पण आता तीन महिन्यानंतर का होईना चित्र बदलत आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला १६ रुपये किलो असा दर मिळाल्याने समधान व्यक्त होत आहे.

पावसाळ्यामध्ये कांद्याची आवक ही घटते. ज्या शेतकर्‍यांकडे साठवणूकीची सोय आहे त्यांचाच कांदा मार्केटमध्ये दाखल होतो. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला असून पावसामुळे कांद्याची आवक घटताच त्याचा दरावर परिणाम होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा चाळ असून शेतकर्‍यांना या चाळीचाच अधिकचा फायदा होत आहे.

Exit mobile version