कांद्याच्या दरात मोठी घट; नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी निवडला ‘हा’ मार्ग

onion 1

नाशिक : खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही अवकाळीची अवकृपा राहिल्याने कांदा उत्पादनात घट झाली आहे. असे असाताना मागणी नसल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी थेट कांदा सावठवणूकीवर भर देत आहे. भविष्यात दर वाढताच विक्री हे धोरण शेतकर्‍यांनी ठरवले आहे.

कांदा दरातील लहरीपणाचा अधिकतर फटका हा शेतकर्‍यांनाच बसलेला आहे. यावेळी ऐन उन्हाळी हंगामातील कांदा मार्केटमध्ये दाखल होत असतानाच दरात घसरण होण्यास सुरवात झाली होती. फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० पर्यंत दर मिळत होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस करीत कांदा छाटणी करुन विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल केला मात्र, आवक वाढताच दर घसरले आहे. ३ हजार ५०० वरचा कांदा थेट ८०० ते ९०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता विक्री ऐवजी साठवणूकीला प्राधान्य देतांना दिसत आहेत.

योग्य प्रकारे करा कांद्याची साठवणूक
कांदाचाळीत कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक करणे गरजेचे असते. तसे न केल्यास ४५-६० टक्क्यांपर्यंत त्याचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. योग्य प्रकारे साठवण केल्यास कांदाचाळीत ४-५ महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो.

Exit mobile version