शासकीय नोकरीचा पाठलाग करणे सोडून देत केली संत्रा शेती, तरुण शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पादन

vilas-idhole-vashim-adoli

वाशिम : शासकीय नोकरी मिळविण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा! लाखों तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात. यातील काही यशस्वी होतात तर काहिंच्या पदरी निराशा पडते. मात्र पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विदर्भातील एका तरुण शेतकर्‍याने आपल्या वडिलोपार्जित शेतीत नवीन प्रयोग करत लाखों रुपयांचे उत्पादन घेवून दाखविले आहे.

वाशीमच्या अडोळी गावातील विलास इढोळे (Vilas Idhole Success Story) यांच्याकडे वडिलोपार्जीत सात एकर शेती आहे. वैभव हा विलास यांचा एकूलता एक मुलगा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे वैभव पुण्याहून आपल्या गावी परतला. तेंव्हा त्या पाहिले की वडीलांनी तीन एकर शेतीमध्ये आठ वर्षापूर्वी संत्रा लागवड केली. पारंपारिक पद्धतीने संत्र्याचे ते उत्पन्न घ्यायचे. यातून त्यांना वार्षिक चार लाखापर्यंत उत्पन्न व्हायचे.

मात्र, वैभवने आपल्या शिक्षणाचा व इंटरनेटचा योग्य वापर करत संत्रा पिकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती गोळा करायला सुरुवात केली. अशातच त्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशीम आणि पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकारी, तंज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले. अधिकार्‍यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याने संत्रा शेतीत प्रयोग केले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर नेले. यापुढे संत्राचे उत्पन्न हे १५ ते २० लाखापर्यंत नेण्याचा त्याचा मानस आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version