शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, आज आणि उद्या पाऊस, गारपिटीची शक्यता

Weather Updates मुंबई : उत्तरेकडील पश्चिम चक्रावात आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यासह पुढील ४,५ दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही १० आणि ११ तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट आली असतांना हवामान विभागाने भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे आर के जेनामनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, उत्तरेकडील पश्चिम चक्रावाताच्या वाढत्या प्रभावामुळे मध्य भारत आणि पूर्वेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस होईल.

यामध्ये ओडिशा, झारखंड, बंगाल आणि बिहारचा समावेश आहे. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावातामुळे ११ जानेवारीपासून पूर्वेकडील भागात प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवून येईल. सोमवार व मंगळवारी मराठवाठा व विदर्भात काही ठिकाणी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Exit mobile version