छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी सुखी का होता? वाचा सविस्तर

shivaji-maharaj-farmer

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक रुपं आहेत. स्वराज्याची स्थापना करतांना त्यांनी आदर्श निती तयार केली होती. या नितीचा मुख्य कणा शेतकरी होता. स्वराज्यात शेतात राबणारा शेतकरी हाच खरा आधार होता व त्याचा व्यवसाय हा समाजातील महत्वाचा मानला जात होता कारण त्याचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते.

रयत सुखी करण्याबाबत शिवरायांनी या विषयक धोरण आखले. जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली होती. आणि त्यावरच सारा आकारला जात असे. शेत मालाला भाव मिळण्यासाठी परराज्यात विक्री, साठा व योग्य वेळी योग्य माल लागवड करण्याची नीती आखली. शेतकरी सुखी राहावा यासाठी तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल. हे धोरण अंगिकारले.

शेतीसाठी दुर्बल शेतकर्‍यांना बैलजोडी, बी-बियाणे सरकारातून देण्याची सोय केली. तसेच खरेदीसाठी दिलेली रक्कम वाढीव दराने वसूल करू नये. दुष्काळात गावोगाव फिरून शेतकर्‍यांना धान्य मदत करणे, पडीक जमीन लागवडी खाली आणणे. त्यासाठी सरकारकडून रक्कम देणे, कर्जात बुडालेल्या शेतकर्‍याला वेळ प्रसंगी कर्ज माफी देणे. सिंचन व्यवस्था वाढीस लावली. सर्वोत्तपरी रयत सुखी राहण्यासाठी शिवरायांनी सरकार ते शिपाई यांना मागर्दर्शक नीती आखून दिली.

जनावरांचा चारा काटकसरीने वापरावा. उधळपट्टी करू नये. पावसाळ्यात धान्य व चारा टंचाई निर्माण झाल्यास उपासमारीने घोडी मरतील. अश्यावेळी शेकर्‍यांकडून कडून धान्य, भाकरी, भाजीपाला आणाल तर त्यामुळे शेतकरी उपाशी मरेल. त्यांच्या परवानगी शिवाय भाजीच्या देठाला हात लावता कामा नये. योग्य भाव देऊ खरेदी करावे अन्यथा बाजारातून खरेदी करावे, असे नियम त्यांनी आखून दिले.

याही पलीकडे शिवराय आपत्ती व्यवस्थापनाबाबत सांगतात, रात्री झोपताना विस्तव, दिवा व कोणत्याही प्रकारची आग विझवून झोपावे. जेणे करून आग लागणार नाही. पागा, जनावरे, गवतचारा, लाकूड फाटा, धान्य आदी आगीत भस्मसात होवून परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होईल. शेतकर्‍यांप्रती अशी आदर्शनिती जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाही.

रयतेला विशेषत: शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने सुखी ठेवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा…. आपणा सर्वांना शिवजयतींच्या शुभेच्छा…..

हे देखील वाचा :

Exit mobile version