शेतकरी आणि जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणार्‍या या तणनाशकावर बंदी

banned pesticides in india

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर तणनाशक म्हणून वापरल्या जाणार्‍या ग्लायफोसेट या रसायनाच्या थेट वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम झाल्याचे सरकारने नमूद केले आहे. २६ ऑक्टोबरच्या रात्री सरकारने जारी केलेल्या राजपत्रात ग्लायफोसेटवर बंदीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. गॅझेटमध्ये असे लिहिले आहे की शेतकरी केवळ कीटक नियंत्रण ऑपरेटर (पीसीओ) द्वारे ग्लायफोसेट वापरण्यास सक्षम असतील.

पीक लवकर सुकविण्यासाठीही होतो उपयोग
चहा पिकवणार्‍या राज्यांमध्ये, ग्लायफोसेटचा वापर मुख्य तण नियंत्रण म्हणून केला जातो. ग्लायफोसेटच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना असे आढळून आले आहे की शेतकरी हरभरा पीक लवकर सुकविण्यासाठी त्याचा वापर करतात. ग्लायफोसेटचे शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम आढळून आले आहेत. भारतात एचटी बीटी कापसाची लागवड झाली तेव्हा ग्लायकोफेटचा वापर अनेक पटींनी वाढला. त्यामुळे जमिनीतील खत शक्ती, भूजलावरही परिणाम होत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लूएचओ) आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी एका अहवालात दावा केला आहे की ग्लायफोसेटमध्ये कर्करोगजन्य रसायने असतात. केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये ग्लायफोसेटवर आधीच बंदी आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता सर्व राज्यांमध्ये त्याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे.

Exit mobile version