शेतकर्‍यांनो.. कांदा बियाणे खरेदी करण्याआधी हे वाचा…

onion seed 1

जळगाव । ऑक्टोबर महिन्यात कांदा लागवडीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरु होते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य बियाण्यांची खरेदी असते. गत काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता. बनावट किंवा चुकीचे बियाणे खरेदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकर्‍यांनी योग्य दर्जाचे बियाणे खरेदी केले पाहिजे. याच अनुषंगाने योग्य बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गुणवत्ता व दर्जाचे हमी देणार्‍या अधिकृत विक्रेत्याकडुनच खरेदीस प्राधान्य द्या, बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन पावतीसह खरेदी करा, खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन, पिश्वी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची काढनी होईपर्यंत जपून ठेवावे.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सिलबंद / मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतीम मुदत व लॉट क्रमांक पाहुन घ्यावा.

कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचार्‍याशी संपर्क साधावा. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष / दुरध्वनी/ ईमेल/ एस.एम.एस/ इ. व्दरे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव शिंदे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version