अरे बापरे : बासमती तांदळात कीटकनाशकाचे प्रमाण जास्त! १० कीटकनाशकांवर बंदी

favarani Pesticides 1

मुंबई : कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर होत असल्याने शेतजमीन निकृष्ट होत चालली आहे. परिणामी उत्पन्नात देखील घट येत आहे. दुसर्‍या बाजूला याचे मानवी जीवनावरही विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. अशातच बासमती तांदळात जास्त प्रमाणात कीटकनाशके आढळून आल्याचे समोर आले आहे.

कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याने बासमती तांदूळ युरोपियन युनियन, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात अडचणी येत असल्याने हा प्रकार समोर आला आहे. यापार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये १० कीटकनाशकांवर २ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यात ट्रायसायक्लोआझोल, बुप्रोफेझिन, एसीफेट, क्लोरपायरीफॉस, मेथिमिडोफॉस, प्रोपिकोनाझोल, थायोमेथॅक्सम, प्रोफेनोफोस, आयसोप्रोथिओलीन, कार्बेन्डाझिम यांचा समावेश आहे.

या कीटकनाशकांचा पर्याय म्हणून वापर करा
ट्रायसायक्लोआझोलऐवजी टेब्युकोनाझोल, डायफेनोकोनाझोल, हेक्साकोनाझोल. बुप्रोफेझिनच्या जागी इमिडाक्लोप्रिड, बायफेन्थ्रीन, फिप्रोनिल. एसीफेटऐवजी इमिडाक्लोप्रिड, एसिटामिप्रिड, फिप्रोनिल. क्लोरपायरीफॉसच्या जागी बायफेन्थ्रीन, क्लोरोथिओनिल, काटप हायड्रोक्लोराईड. काटप हायड्रोक्लोराइड, क्लोराँट्रानिलिप्रोल, लॅमडासीहॅलोथ्रीन मेथिमिडोफॉसचा पर्याय म्हणून. प्रोपिकोनाझोलच्या पर्यायांमध्ये टेब्युकोनाझोल, डायफेनोकोनाझोल, हेक्साकोनाझोल यांचा समावेश होतो. इमिडाक्लोप्रिड, क्लोराँट्रानिलिप्रोल, थायोमेथॅक्सम ऐवजी लॅमडासिहॅलोथ्रीन. प्रोफेनोफॉसच्या पर्यायांमध्ये टेबुकोनाझोल, डायफेनोकोनाझोल, हेक्साकोनाझोल यांचा समावेश होतो. आयसोप्रोथिओलेनला पर्याय म्हणून कॉपर ऑक्सीक्लोराईड, अ‍ॅझाक्झाट्राबिन, डायफेनोकोनाझोल. टेब्युकोनाझोल, डायफेनोकोनाझोल, हेक्साकोनाझोल हे कार्बेन्डाझिमला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकतात.

Exit mobile version