कापसाला ११ हजारांचा भाव; जाणून घ्या कुठे?

मुंबई : खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापासाला मोठा फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर देखील झाला. मात्र एकीकडे उत्पादनात घट झाली असली तरी दुसरीकडे यंदा कापसाला प्रति क्विंटल १० हजाराचा विक्रमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरुन निघाले. आता तर अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल ११ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. इतीहासात प्रथमच कापसाला इतका विक्रमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावर्षी सीसीआयने कापसाच्या मध्यम धाग्याला ५७७५ तर लांब धाग्याला ६१०० एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्रा बाजारपेठेत सरासरी १० हजाराच्या वर भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. यंदा कमी झालेले उत्पादन व केंद्र सरकारने निर्यातीबाबत घेतलले धोरण हे शेतकर्‍यांच्या पथ्यावर पडतांना दिसत आहे.

जानेवारी महिन्यात कापसाला प्रति क्विंटल १० हजारच्यावर दर मिळाल्यानंतरही हे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ती अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्ण झाली आहे. अकोट बाजार समितीत काल कापसाला क्विंटलला तब्बल ११ हजारांचा भाव मिळाला आहे. हा कापसाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी असा भाव आहे.

Exit mobile version