महाराष्ट्रात ‘या’ 19 खतांवर घालण्यात आली बंदी ; नेमकी का आणि कशासाठी?

fertilizer

मुंबई : खरीपनंतर आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामा करिता खतांची आवश्यकता पडणार आहे. अशातच तुम्ही खतांची (Fertilizer) खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दर्जाच्या पातळीवर १९ प्रकारची खते अप्रमाणित असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने राज्य सरकारने या खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली आहे. तसेच ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. त्यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

या खतांवर बंदी?
शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Exit mobile version