सोयाबीनचे ३७ हजार क्विंटल बियाणे पेरणीस अयोग्य; वाचा सविस्तर

soyabean

परभणी : बियाणांची उगवण क्षमता तापसण्यासाठी बिजोत्पादन ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये जर बियाणांची उगवण क्षमता चांगली असेल तरच बियाणे पेरणीसाठी परवानगी दिली जाते. पण परभणी विभागातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या पाच जिल्ह्यातील बियाणे उत्पादकांबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. बियाणे उत्पादकांचे सोयाबीनचे ५८ हजार २५० क्विंटल बियाणे हे उगवण क्षमतेमध्ये पास झाले आहे तर दुसरीकडे ३७ हजार क्विंटल बियाणे हे नापास झाले आहे.

उगवण क्षमता वाढण्यासाठी बियाणेच महत्वाचे. दर्जेदार सोयाबीनवरच उगवण क्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे विविध संस्थांकडून जरी बियाणे पुरवठा केला जात असला तरी त्याची आगोदर उगवण क्षमता तपासणे हे अनिवार्यच आहे. पावसामध्ये सोयाबीन भिजले आणि त्याचा दर्जा ढासळला होता.

खरिपातील सरासरी क्षेत्र आणि शेतकर्‍यांच्या मागणीचा अंदाज घेता खरिपातील काढणी कामे सुरु झाले की बीजोत्पादनासाठी यंत्राना राबली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृषी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून बियाणे प्रमाणीकरणासाठी परभणी येथील कार्यालयात आणण्यात आले होते. असे असताना सोयाबीनचे अधिकचे बियाणे हे फेल झाले आहे. असे असले तरी बियाणांची टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version