Subsidy on Agriculture Loan : नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये

farmer-with-money

CashBack on Agriculture Loan : शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत अनेकवेळा घोषणाही झाल्या होत्या मात्र बुधवार दि.२२ जुन रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक कर्जाच्या रकमेवर ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Subsidy on Agriculture Loan)

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत हा लाभ मिळेल. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येईल. २०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड करणे आवश्यक आहे. २०१८-१९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असावे. तसेच २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड करणार्‍यांना हा लाभ मिळेल. २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकर्‍यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजूरी दिल्यामुळे राज्यातील लाखों शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता सरकार याची अंमलबजावणी कधी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version