शेततळे तयार करतांना हे निकष लावा होईल मोठा फायदा

shet tale

राहुरी : पावसाच्या पाण्याचे योग्य रितीने व्यवस्थापन केल्यास कोरडवाहू शेतीमधील अडचणीवर थोड्या फार प्रमाणात मात करता येते. यासाठी शेततळ्यांचा उपयोग होतो. शेततळ्याच्या माध्यमातून शक्य आहे. शेततळे हे दोन प्रकारची असतात. एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे व दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध टाकून पाणी अडवून तयार केलेला तलाव. अशा शेततळ्याच्या निर्मितीचे वेळी शेतातील चांगली जमीन वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.

शेतकर्‍यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना आपल्या शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल या प्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, दलदलीची व शेताच्या खालच्या बाजूची जमीन
निवडावी. शेततळ्याची जागा निवडताना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये, कारण अशी जागा निवडल्यास तळे गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजुला थोड्या अंतरावर खोदावीत. मजगी गटाच्या वरील खाचराच्या ठिकाणी / जवळ शेततळ्यासाठी जागा निवडावी. ज्यामुळे
सभोवताली जमीन दलदल व चिबड होईल अशा ठिकाणी शेततळे घेण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण ३ टक्के पर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावीत.

शेततळ्यांच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष
१. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमीन ज्यात चिकनमातीचे प्रमाण जास्त आहे. अशा जमिनी शेततळ्यास योग्य असतात.
२. मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट अशी जमीन असलेली जागा शेततळ्यासाठी निवडू नये.
३. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण ३ टक्के पर्यंत असेल त्या ठिकाणी शेतळी घेण्यात यावीत.
४. स्वतःच्याच शेतात बसेल आणि चारही बाजूने किमान १० फुट जागा राहिल अशीच जागा निवडावी.
५. नाल्याच्या / ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेऊ नये.
६. पर्जन्यमान व स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार कमीत कमी १००० घ.मी. पाणी वरील पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणार असेल अशाच ठिकाणी
शेततळे घेण्यात यावे. तसेच पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पारीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असावे.

शेततळ्यांचे फायदे
१. पाणलोट क्षेत्रात भुगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
२. आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
३. पुरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
४. चिबड व पाणथळ जमिन सुधारणेसाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो.
५. मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो.

Exit mobile version