‘ड्रोन’द्वारे फवारणी फायद्याची का धोक्याची? वाचा काय म्हटले आहे केंद्राला पाठविलेल्या पत्रात…

dron

नागपूर : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ठोस तरतूदी जाहीर केल्यानंतर कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढविण्यासंबंधात हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात शेतात किटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्यासंबंधी प्रयोग केले जात आहे. मात्र ड्रोनव्दारे करण्यात येणारी किटकनाशकांची फवारणी फायद्याची का तोट्याची? याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे.

अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकर्‍यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य असल्याने कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन चा वापर काही क्षेत्रात हळूहळू होवू लागला आहे. अशात महाराष्ट्र कीटकनाशक विषबाधित व्यक्ती संघटनेने या हवाई फवारणी धोरणाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीचे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांना लिहले आहे. हवेतून किटकनाशकाच्या फवारणीची प्रात्याक्षिके संबंधीतांपर्यंत पोहचली नाही तर त्याचे दुष्पपरिणाम होतात. या सर्व बाबींचा विचार व्हावा म्हणून या संघटनेची मागणी आहे.

ड्रोनचा शेती व्यवसयामध्ये वापर होण्यापूर्वी योग्य ते प्रशिक्षण आणि सर्व माहिती दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ड्रोन खरीदेची वेळ आली तरी ना प्रशिक्षण त्यासंबंधीची माहिती. त्यामुळे थेट ड्रोनचा वापर केला तर त्याचे धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरण, जैवविविधतेला देखील यामाध्यमातून धोका निर्माण होऊ शकतो. याबाबतचा विचार मसुद्यात करण्यात आलेला नाही असे या संघटनेचे म्हणणे आहे, त्यामुळे प्रत्यक्ष वापरापूर्वी योग्य तो विचार महत्वाचा असल्याचे संघटनेच्या या पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version